भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली

dehacha palat vithobache bheti | jal lavana ganthin padon theli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥ धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥ रात्नंदिवस भाव विठठलाचे पायीं । चित्त ठायींचे ठायीं मावळलें ॥३॥ नामयाचे जनी आनंद पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥