भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे

dehabuddhi vase lobh jayan chittin | apulen janati paraven je

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥ तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥ तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥