भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय

dehabhav sarva jay | tevhan videhi sukh hoy

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥ तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥ ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥ त्या एकीं एक होतां । दासी जनी कैंचि आतां ॥४॥