भजनी मालिका

भजने

देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥ आहे नाहीं संशयबुद्धी । तेणें ते गुंतलें कर्माचे सिद्धि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥ द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाहीं उरलें मागील कांहीं ॥१॥ देहीं देह आहे तोवरीं अहतां । निमाचिया तत्त्वतां वाव सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहुडा चरण वाहातुसे वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥ देखिलागे माय यमुनेचे तीरीं । हात खांद्यावरी राधि-केच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥१॥ मनीं वेध लागला त्या गोपाळाचा। जो जिवलग गोपगोपिकेचा ॥२॥

रचनाकार: संत सेना

दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥ करुनियां तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दैत्यभारें पीडिली पृथवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । भक्तीप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दोघें शरणागत आले श्रीरामासी । मारिलें वालीसी एका बाणें ॥१॥ बाणलीसे भक्ति अंगदाचे अंगी । श्रीरामें वोसंगीं धरियेले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां ॥१॥ पायीं रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥ अहो रखुमाबाई विठोबासि सांगा । भ्रतारासि कां गा वेडें केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते ।।१।। अहो रखुमाबाई विठोबासि सांगा अतारासि कां गा वेडें केलें ॥२॥

रचनाकार: संत राजाई

दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणीं । म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥ मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा । अपराध क्षमा करा माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एक एका छंदें रे ॥१॥ कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम