भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका

kay krupevin ghalaven sankaden | ninshchiti nivaden konya eka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका ॥१॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥ धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥ तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुर ॥३॥