भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें

kay kelen magen konachen tun baren | shevatin vannaren sang kari ten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥ संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥ काय काय तरी सांगों तुज गुण । भिल्लिणीची आण सत्य मनीं ॥३॥ सत्य मानी वाळी वशिष्ठासहित । नामा म्हणे मात ही पुरातन ॥४॥