भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना

kay karun jiv hoto kasavis | kondaliye dis game chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥ पडिलें हें दिसे ब्रम्हांड चि वोस । दाटोनि उछ्ववास राहातसे ॥२॥ तुका म्हणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥३॥