भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय काज कोणासवें । विठ्ठल देवें वांचूनी

kay kaj konasaven | viththal deven vanchuni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काय काज कोणासवें । विठ्ठल देवें वांचूनी ॥१॥ काय नाहीं चरणापासीं । पाहिजे ज्याशी तें तेथें ॥२॥ म्हणोनियां जीवें साठी । करुनि नेहटी बैसलों ॥३॥ निळा म्हणे सभाग्य धणी । पुरवील आयणी सकळ ही ॥४॥