भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं या कर्मासी धांव पाव हृषीकेशी

kay karun ya karmasi dhanv pav hrushikeshi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काय करूं या कर्मासी धांव पाव हृषीकेशी॥१॥ नाश होतो आयुष्याचा तुझें नांव नये वाचा ॥२॥ काय जिणें या देहाचें अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥ व्यर्थ कष्टविली माता तुझे नाम नये गातां ॥४॥ जन्ममरणाचें दुःख म्हणे जनी दाखवी मुख ॥५॥