भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली

kay karun maj nagavilen alasen | bahut ya sosen pida keli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥ हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥ द्वैताचिया कैसा सांपडलों हातीं । बहुत करती ओढाओढी ॥२॥ तुका म्हणे आतां आपुलिया सवें । न्यावें मज देवें सोडवूनि ॥३॥