भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी

kay kelen jalacharin | dhivar tyanchya ghatavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥ हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥ श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥ तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥