भजनी मालिका

भजने

काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय ते विरक्ती न कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥ नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदें या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तें वैराग्य बोकडाचे परी । भलतीया भरीं पडतसे ॥१॥ काय ती समाधी कुकुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तीहीण ॥१॥ माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरीष्ठ तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥ निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळीं ॥१॥ ज्याचिये भेटीचें आर्त ब्रम्हांदिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय दिवस गेले अवघे चि वराडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥ क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥ म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥ काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम