भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना

kan re tumhi nirmal harigun gana | nachat anandarup vaikunthasi jana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥१॥ काय गणिकेच्या याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥ध्रु.॥ ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी त्यांच्या पातकां नाहीं थार ॥२॥ पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचें पुण्य ॥३॥