भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें

kan majhe pandhari na dekhati dole | kay hen na kale pap yanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥ पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥ कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥२॥ कां या इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥३॥ तुका म्हणे कइप जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥४॥