भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी करसी वायां

kan re bhambavasi nastikasathin | koradi kan ati karasi vayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कां रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी करसी वायां ॥१॥ हें तों पोसणें आणिलें उसणें । जयाचें तया देणें अनायासें ॥२॥ ‘घ्यावें त्याचें द्यावे’ ऐशी आहे नीत । तूं रे दुश्चित वाउगा मनीं ॥३॥ न देतां उरी देणें आहे केव्हां । वाउगा तो हेवा धरती पोटीं ॥४॥ एका जनार्दनीं भरता मापोडी । पडतसे उडी खालीं मग ॥५॥