भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया

kan re das hosi sansaracha khar | duhkhache dongar bhogavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥ मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥ आणीक ही भोग आणिकां इंद्रियांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥२॥ रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥ तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठी । देवासवें तुटी करितोसी ॥४॥