भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं

kan re janmala abhagi | priti na dhari pandurangin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कां रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं ॥१॥ उत्तर चांगलें रें मुख । रामनाम न म्हणती विख ॥२॥ उत्तम क्रूर ते दिसती । दानधर्म न घडे हातीं ॥३॥ उत्तम पद ते शोभती । परि तीर्थयात्रे न जाती ॥४॥ पुष्ट दिसतें शरीर । व्यर्थ वांचोनि भूमीभार ॥५॥ ऐसे अभागी जन्मले । एका जन्मार्दनीं वायां गेलें ॥६॥