भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे नायकसी गव्हारा । कां रे न भजसी ईश्वरा

kan re nayakasi gavhara | kan re na bhajasi ishvara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कां रे नायकसी गव्हारा । कां रे न भजसी ईश्वरा ॥१॥ सोपा मंत्र विठ्ठराज । तेणें पुरे सर्व काज ॥२॥ नको संसाराचें कोड । अंतकांळीं यमदंड ॥३॥ एका जनार्दनीं कींव भाकी । रामनाम वदा मुखीं ॥४॥