भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रें हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा

kan ren havabhari jahalasi pamara | bhar vahasi khara prapanchacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कां रें हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा ॥१॥ नाम श्रीरामांचे नित्य घेई वाचे । तुटलें जन्माचें दुःख जाण ॥२॥ यातना यमाची दुःखाची परवडी । नामें धरी गोडी आवडीनें ॥३॥ एका जनार्दनीं नायकसीं मूढा । अहा रे दगड धर्मलंडा ॥४॥