भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळासलें मनीं । तेंचि उपदेशा तोंची कानीं

kalasalen manin | tenchi upadesha tonchi kanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कळासलें मनीं । तेंचि उपदेशा तोंची कानीं ॥१॥ भवाब्धी हा तारावया । नाम तुमचें पंढरिराया ॥२॥ आपणा आणि आणिकां । आड येऊं नेदूं शंका ॥३॥ निळा म्हणे जीवेंसाठीं । करितो करुनियां आटी ॥४॥