भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवडी कवडी घाली खांचे । नित्य नूतन भिक्षा वाचे

kavadi kavadi ghali khanche | nitya nutan bhiksha vache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कवडी कवडी घाली खांचे । नित्य नूतन भिक्षा वाचे ॥१॥ अतिथासी दान । तेंतों स्वप्नीं नाहीं जाण ॥२॥ पर्वकळ विधी । न कळे अभाग्यासी कधीं ॥३॥ ठेवुनी चित्त धनावरी । सवेंचि फिरे घरोघरीं ॥४॥ जन्मा येवोनि अघोर । एका जनार्दनीं भोगिती पामर ॥५॥