भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा

kale na kale tya dharma | aika sangaton re varma | majhya vithobachen nam | atahasen uchchara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥ तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥ पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥२॥ तुका म्हणे मोल । न लगें द्यावें वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥