भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक

kalidharma magen sangitale santin | achar sanditi dvijalok

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥ ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥ तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥ देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥ तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥