भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा । हीं दोन्हीं अनुसंधानें चुकती जगीं

karmi karmathapana dharmin dharmishthapana | hin donhin anusandhanen chukati jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा । हीं दोन्हीं अनुसंधानें चुकती जगीं ॥१॥ कर्माचें जें कर्म धर्माचा अधिधर्म । तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥ निगमांचे निजसार अगमाचे भांडार । न कळे ज्याचा पार वेदशास्त्रां ॥३॥ एका जनार्दनीं श्रुतीसी नाकळे । तो भक्तिबळें उभा विटे ॥४॥