भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलिकाळाचे न चले बळ । ऐसे सबळ हरिदास

kalikalache na chale bal | aise sabal haridas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलिकाळाचे न चले बळ । ऐसे सबळ हरिदास ॥१॥ सेवेचें तो कवच अंगीं । धीर प्रसंगीं कामक्रोध ॥२॥ रामनाम हाचि बाण । शस्त्र निर्वाण सांगातीं ॥३॥ एका जनार्दनीं यमाचे भार । देखतां समोर पळती ते ॥४॥