भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें

karmaten valilen dharmaten valilen | sarva harapalen jethichen tethen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥ विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥ वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥ चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहीच भेटला एव आम्हां ॥४॥