भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय

kathani pathani karuni kay | vanchuni rahani vanyan jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥ मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥ पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥ मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥ मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥ आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥