भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा पुराण ऐकतां । झोंपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडतां । व्यापी चिंता तळमळ

katha puran aikatan | jhompe nadile tattvata | khatevari padatan | vyapi chinta talamal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा पुराण ऐकतां । झोंपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥ ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जे चित्ती । कांहीं नेघे आपुल्या ॥ध्रु.॥ उदक लावितां न धरे । चिंता करी केंव्हा सरे । जाऊं नका धीरे । म्हणे करितां ढवाळ्या ॥२॥ जवळी गोचीड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका म्हणे दूर । देश त्याग तयासी ॥३॥