भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा

katha devachen dhyan | katha sadhana mandan | kathe aisen punya anik nahin sarvatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥ ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥ मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥ भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं म्हणे तुका ॥३॥