भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें

katha karoniyan mol jyapen gheti | te hi doghe jati narakamadhyen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥ ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा । अखंड स्मरा रामनाम ॥ध्रु.॥ मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगाविया ॥२॥ तुका म्हणे करीं ब्रम्हांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥३॥