भजनी मालिका
← भजनांकडे परत

कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे

kadasani dharitan adachanicha thav | mhanauni jiv trasalase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥ लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥ संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥ तुका म्हणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥३॥