भजनी मालिका

भजने

एक्या जिवें एक्या भावें । एकचि एकलें एक्या देवें ॥१॥ एकाएकीं एकचि झालें । एका अंगी विरोनी गेलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एवढा संकोच तरि कां व्यालासी । आह्मी कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥ कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुह्मीं देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एवढासा माझा भाव तो कायी । तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं ॥१॥ परी तुमचें अगाध देणें । जाणवलें यावरी उदारपणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐक एक सखये बाई नवल;अ मी सांगुं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥ देवकीने वाईला यशोदेनें पाळिला । पांडवाचा बंदिजन होऊनियं राहिला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥ मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥ माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस । न करीं निरास आर्तभूतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐकतां कीर्तन जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममात्रें ॥१॥ मृत्युलोकीं जो जन्म इच्छी नर । त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥ सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकतां निरोप पुंडलिक भक्त । जाला सद्‌‍गदित धन्य म्हणे ॥१॥ धन्य ती आळंदी धन्य विष्णुदास । धन्य हा दिवस देव भेटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव