भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान

aik re sumana bodhin sudnyan

ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान । मायिक बंधन तुटे जेणें ॥१॥ श्रीगुरुचे पाय हृदयीं शिवशी । टाकी प्रतिष्ठेशी जाणिवेचे ॥२॥ नित्यानित्य दोन्ही करीं गा विचार । आहे मी हे कीर विचारिजे ॥३॥ जीव शिव भेद कासयासी जाहाले । वळखीं वहिले तिये स्थानीं ॥४॥ मुळीं तुझें रुप हे रें अनुभवणे । ज्ञानदेव म्हणे ब्रह्म तूंचि ॥५॥