भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक बापा ह्रषिकेशी । मज ठेबीं पायांपाशी

aik bapa hrashikeshi | maj thebin payampashi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐक बापा ह्रषिकेशी । मज ठेबीं पायांपाशी ॥१॥ तुझें रूप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥ हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥ तुजविण देवराया । कोणी नाहींरे सखया ॥४॥ कमळापति कमळपाणी । दासी जनी लागे चरणीं ॥५॥