भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां

aik bapa majhya pandharichya raya | kirtana alyen ya artabhutan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥ माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस । न करीं निरास आर्तभूतां ॥२॥ त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तयां ॥३॥ जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा । अढळ पद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥ उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारू काय वानूं ॥५॥ म्हणे दासी जनी आलें या कीर्तनीं । तया कंटाळुनी पिंटू नका ॥६॥