भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतां निरोप पुंडलिक भक्त । जाला सद्‌‍गदित धन्य म्हणे

aikatan nirop pundalik bhakta | jala sad‌‍gadit dhanya mhane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकतां निरोप पुंडलिक भक्त । जाला सद्‌‍गदित धन्य म्हणे ॥१॥ धन्य ती आळंदी धन्य विष्णुदास । धन्य हा दिवस देव भेटे ॥२॥ ज्ञानदेवा आलें वैकुंठीचें रूप । पोचतां निरोप पुंडलिका ॥३॥ पुंडलिकें तेव्हां गरुड पूजियेला । ज्ञाना बैसविला विमानांत ॥४॥ पुढें तो गरुड मागें ये विमान । तुक्मिणी दुरोन दावी देवा ॥५॥