भजनी मालिका
← भजनांकडे परत

एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें

evadha prabhu bhaven | tenen sampushti rahaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥ होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥ एवढा जगदानी। मागे तुळसीदळ पाणी ॥२॥ आला नांवा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥३॥