भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक धावे सुनाट एकीनें धरिलें बेट

aik dhave sunat ekinen dharilen bet

ऐक धावे सुनाट एकीनें धरिलें बेट । एकीनें शेवट साधीयेला ॥१॥ कोणे तत्त्वीं हरि कैसी याची परी । नांदे कोणे घरीं सांगीजेसु ॥२॥ सखी सांगे बाई भावो घरी देहीं । एकारुपा सोयी येईल घरा ॥३॥ बापरखुमादेवीवर विठ्ठल अवचितां । निवृत्ति जे समता सांगितलें ॥४॥