भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा

aik re jana tujhya svahitachya khuna | pandharicha rana manamaji smarava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥५॥