भजनी मालिका

भजने

ऐका पंढरीचें महिमान । राउळें तितुकें प्रमाण । ते-थील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥ ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकीं गति । ते आनिका तीर्था जाती । तीं वंदिती तयांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐका बापा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१ ॥ माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आसनकरींनिरासआर्तभूतां॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

ऐका रे उद्धवा तुज सांगतों गुज । संतचरणरज वंदीं तु सहज । तेणें कार्य कारण होईल तुज । अंतरदृष्टी करुनी परीस निज ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥ माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐका श्रोते सावधानता । सांगेन उपमन्युची कथा । एक्या भावें परिसतां । सायुज्यता पाविजे ॥१॥ बाळ तो लडिवाळ तान्हा । वाढे मातेचिया स्तन पान्हा । परि ते असे दुर्बळपणा । उपमन्यु नांव तयेचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥ उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐका संतसज्जन । निजहित कुशल पूर्ण । करुनी सर्वांगाचे कान । शब्दार्थ जाणावा ॥१॥ जीवामाजीं घालुनी जीव । परिसतां हे अर्थगौरव । तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐका सावधान कथा शिवरात्र । पावन पवित्र तिहीं लोकीं ॥१॥ भाव धरोनियां आचरती जरी । वास शिवपुरीं घडे त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥ तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित।।ध्रु।। हिरण्यकश्यपकुळीं नामा प्रल्हाद । पद्मीणी नाम माझें श्रेष्ठ दासीचें पद।।१।।

रचनाकार: संत जनाबाई

ऐकावें चरित्र परीक्षितिराया । बरोबरी जाया एक असे ॥१॥ तोडोनियां पुष्पें करी अलंकार । घालीत श्रीधर तिजवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकिला तुमचा अगाध महिमा । दोषियां अधमां तारितसां ॥१॥ म्हणोनियां जी आलों शरण । सत्य मानूं संतवाणी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकिलें मागें तारिले बहुता। धांवसी की आतां नाम घेतां ॥१॥ बरव्यापरी मज ऐसे कळों आलें । म्हणउनी विठ्ठलें करी धावा ॥२॥

रचनाकार: संत सेना

ऐकीं एकपणाचा घेउनियां त्रास । जाला नानाकार स्वरुपें बहुवस । म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास । जयाततयामाजीं याचाचि रहिवास वो ॥१॥ ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवे भावें अनुसरल्या प्रमदा । करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा । हसती रुसती करिती विनोदा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतों जीवाचा जिव्हाळा । तुं भक्तराज निर्मळा । सुचित्तें ऐके ॥१॥ मी बैसोनी आसनीं । पुजा करितों निशिदिनीं । तें पूय मुर्ति तुजलागुनी । नाहीं ठाउको उद्भवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐके ऐके बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आतां यासी बांधीना ॥१॥ आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ