भजनी मालिका

भजने

ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी ॥१॥ लावियेला चाळा त्वा जगजेठी । आतां आम्हां सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकतां वचन मानेलें तयासी । पुढें कल्पनेसी ठाव नाहीं ॥१॥ तेथें म्यां मागावें हें कांहीं न कळे । निवतील डोळे दर्शनानें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकतां श्रवणीं परमानंद । उपमर्दे कंद मायेचा ॥१॥ घोशगजरें गजें वाचा । जो श्रुतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकतांचि जीव झाला कासावीस । ह्मणे झालें कैसें अकस्मात ॥१॥ आहां कपाळींचा भोग वोढवला । कांत तो नि-घाला सांडोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकतांचि शब्द होऊनि किरात । राहिला निवांत एके ग्रामीं ॥१॥ पाळणपोषण विषयांची वोढी । करीतसे जोडी पात-काची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐका ऐका वचन माझें । तुम्हीं वदा विठ्ठलवाचें ॥१॥ नामापरतें साधन नाहीं । वेदशास्त्रें देती ग्वाहीं॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐका कलियुगाचा धर्म । पुत्र सांगे पितयास काम । ब्राह्मन त्यजिती ब्रह्मकर्म । ऐसें वर्तमान मांडलें ॥१॥ माया बहिणी दवडिती । स्त्री आपुली आणविती । ऐका ऐका नवल गती । अगा श्रीपति परियसा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥ आणीक ऐका गाए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐका दामासेठी सांगतों तुम्हासी । द्रव्यही कुळासी मागुन घ्यावें ॥१॥ मालधनी आलों घेऊनियां घरा । तुम्ही कां दातारा गांजितसां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव