तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव
tujhe potin thav | vhava aisa majha bhav
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
tujhe potin thav | vhava aisa majha bhav
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
tujhe majapashin man | majhi yethen bhuk tahan
तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तहान ॥१॥ जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काई ॥ध्रु.॥
tujhen mhanavitan kay nas jala | aiken ba viththala kirti tujhi
तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
tujhe varnu gun aisi nahin mati | rahilya tya shruti maunyapanen
तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥
tujhen varma thaven | majhya padiyelen bhaven
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
tujhen varma hatin | dilen sangoniyan santin
तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांडवीन पोटीं ॥ध्रु.॥
tujhya namachi avadi | amhi vitho tujhin vedin
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥
tujhya rupen majhi kaya bharon dyavi pandhariraya | darpaninchi chhaya ekarupen bhinnatve
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे ॥१॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥
tute bhavarog | sanchitakriyamanabhog
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥ ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥
tumacha tuhmin kela gova | atan chukavitan deva
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥ कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
tumachiye dasincha das karuni theva | ashirvad dyava hachi maj
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
tumachi ti bheti navhe aisi jali | koradi cha boli bramhadnyan
तुमची ती भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥
tumache stutiyogya koten majhi vani | mastak charanin thevitasen
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भक्तीभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥
tumachya palana odhatase man | gelon visaron apanasi
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥ लागेल पालट फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥
tumhan amhan uri tonvari | janachari aisen taisi
तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥
tumhan amhan janv jaliya saman | tethen konan kon sanamani
तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥
tumhan amhan tuti hoil yavari | aisen maj hari disatase
तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥
tumhan amhan sari | yethen kaichyacha pari
तुम्हां आम्हां सरी । येथें कईच्याचा परी ॥१॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥
tumhan amhansaven na padavi ganthi | aleti jagajethi kalon atan
तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥
tumhan uddharanen phar | maj dusari nahin thar
तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥ आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥