भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे

tujhya rupen majhi kaya bharon dyavi pandhariraya | darpaninchi chhaya ekarupen bhinnatve

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे ॥१॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥ वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥ जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पहिला नांवें तुका म्हणे खंडलें ॥३॥