भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें

tujhen varma thaven | majhya padiyelen bhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥ तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥