भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं

tujhya namachi avadi | amhi vitho tujhin vedin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥ काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥ तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥