भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तहान

tujhe majapashin man | majhi yethen bhuk tahan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तहान ॥१॥ जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काई ॥ध्रु.॥ माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥२॥ तुका म्हणे साचें । तेथें मागील कईचें ॥३॥