भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु॥ तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझे हित पांडुरंगा ॥१॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझिया दासांचा हीन झालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥ काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चालवितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम