भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हां सरी । येथें कईच्याचा परी

tumhan amhan sari | yethen kaichyacha pari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां आम्हां सरी । येथें कईच्याचा परी ॥१॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥ खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥ तुका म्हणे कोडें । आम्ही नाचों तुज पुढें ॥३॥