भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी

tumhan amhan uri tonvari | janachari aisen taisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥२॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥३॥