भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें

tujhe varnu gun aisi nahin mati | rahilya tya shruti maunyapanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥ रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥२॥ ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥३॥ तुका म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥४॥